पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/92

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पितृसत्ता ही सामाजिक व्यवस्था आणि विचारधारा आहे.या ३ 3 व्यवस्थेत पुरुषांना उत्तम मानलं जातं. त्यांना उत्तम । दाखवण्यासाठी खूपच साच्या धार्मिक, सांस्कृतिक रिती रिवाज, कायदेकानून, रुढी, परंपरा बनविल्या आहेत. म्हणी बनवल्या आहेत. हिंदू मध्ये मान्यता आहे की, आई वडीलांचा अंतीम संस्कार मुलानेच करावा. सर्व धर्मा मध्ये मुलांना वारस मानलं आहे. पतीला कुटुंब प्रमुख मानले जाते. जिथे पुरूषांचं कोड कौतुक केलं जाते तिथे स्त्रियांना कमी व कमकुवत मानले जाते दुजा भावाने वागविले जाते. स्त्रियांनी नेहमी पुरूषांच्या अधिन ५ राहीले पाहीजे,असे मानले जाते. स्त्रियांना ना स्वत:चा मान आहे ना नाव आहे. त्यांच्या नावाची संपत्ती ही नाही. या विचारधारणेमुळे कुटुंबामध्ये मुलांना अधिक प्रेम, उत्तम जेवण, शिक्षण, अधिक स्वातंत्र्य दिले जाते. म्हणूनच आजही। बहुतेक देशांमध्ये स्त्री-पुरुष समानता नाही असमानतेची बीजे अधिकच खोल आहेत. जेव्हा मुलगे १०-११ वर्षाचे होतात तेव्हा तर त्यांना पंख फुटतात त्यांना उडूनही दिलं जातं. बाहेर जाणं, खेळणं या बाबतीत त्यांना अधिक स्वातंत्र्य दिलं जातं. 86