पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मुली १०-१२ वर्षाच्या झाल्या की त्यांच्या स्वातंत्र्या वर गदा येते. फ्रॉक घालत असेल तर तिला सलवार कमीज, साडी घालायला लावतात. छाती, डोकं, पोट, पाठ, तर काही ठिकाणी तर संपूर्ण शरीर झाकायला भाग पाडलं जातं. बाहेर जाण्यावर, वावरण्यावर बंधनं येतात, खेळणं कमी होतं. म्हणजे त्यांचे पंख छाटले जातात. त्यांच्यावर पहारे बसविले जातात. पैशाची कमतरता असेल तर मुलांना चांगल्या शाळेत पाठविले जाते, मुलींना नाही. मुलींचे बाल विवाह होतात, त्यांच्यावर मातृत्वही लादले जाते. ( 17