मुखपृष्ठ
विकिस्रोतावर आपले स्वागत असोवाङ्मयाची भर घालून कुणालाही समृद्ध करता येईल असे एक खुले ग्रंथालय ! |
|
मराठी विकिस्रोत हे एक आंतरजालावर असलेले मुक्त ग्रंथालय आहे. यामध्ये वाचकांसाठी मोफत वाचनाची सोय आहे. आपल्याला या प्रकल्पात भर घालण्यासाठी सादर निमंत्रण. येथे प्राचीन तसेच प्रताधिकार नसलेले लेख आपण आणू शकता. |
साहित्यिकसाने गुरुजी (डिसेंबर २४, इ.स. १८९९ - जून ११, इ.स. १९५०) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते, मराठी साहित्यिक होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करित असत. खोताचे घराणे साधारणत: वैभवसंपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळची परिस्थिती तशी होती ही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरत गेली. ती इतकी की, सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशारितीने बडे घर पण पोकळ वासा झालेल्या या घराण्यात २४ डिसेंबर, इ.स. १८९९ रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल येथे शिक्षक म्हणून काही काळ नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वत:च्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले, सेवा वृत्ती शिकवली. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर|तत्त्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्त्वज्ञानाचा अभ्यासही केला. इ.स. १९२८ साली त्यांनी ‘विद्यार्थी’ हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वत: खादीचाच वापर करत. इ.स. १९३० साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळ|सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी ‘कॉंग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची करमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथील कॉंग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे, इ.स. १९४२ च्या चळवळीत भूमिगत राहून स्वातंत्र्याचा प्रचार, राष्ट्र सेवा दलाचे कार्य - या माध्यमांतून त्यांनी राजकीय कार्य केले. ‘पत्री’ या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यातील बलसागर भारत होवो सारख्या कवितांचा नागरिकांवरील वाढता प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यांतील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वत: तमिळ, बंगाली इत्यादी भाषा शिकले होते. १९४८ मध्ये त्यांनी ‘साधना’ साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चरित्रे, कविता यांमधून त्यांच्यातील संवेदनशील साहित्यिक आपल्याला दिसतो. मानवतावाद, सामाजिक सुधारणा व देशभक्ती ही मूल्ये त्यांच्या साहित्यात ठायी ठायी दिसतात. त्यांनी एकूण ७३ पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांचे बहुतांश लेखन हे तुरुंगात असतानाच केले. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील तुरुंगात असतानाच लिहिली. आचार्य विनोबा भावे-रचित 'गीता प्रवचनेसुद्धा विनोबा भावे यांनी धुळे येथील तुरुंगात सांगितली व साने गुरुजींनी लिहिली. याच धुळ्यातील तुरुंगात त्यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागाबद्दल सुमारे १५ महिने तुरुंगवास भोगला. |
विकिस्रोत प्रमुख साहित्य |
अभंग वाणी |
विकिसमाज
प्रकल्प |
|
|||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
विकिपीडियाचे सहप्रकल्प
विकिस्रोत हा 'विकिमीडिया फाउंडेशन' या विना-नफा तत्त्वावर चालणार्या संस्थेचा प्रकल्प असून या संस्थेद्वारे इतर अनेक विकिस्रोतचे सहप्रकल्प चालवले जातात :
| कॉमन्स – सामायिक भांडार | विकिन्यूज् – बातम्या | विक्शनरी – शब्दकोश | |||
| विकिक्वोटस् – अवतरणे | विकिबुक्स् – ग्रंथसंपदा | मराठी विकिपीडिया – विकिपीडिया | |||
| विकिस्पीशिज् – प्रजातिकोश | विकिविद्यापीठ – शैक्षणिक मंच | मेटा-विकि – सुसूत्रीकरण | |||
विकीस्त्रोत प्रकल्पहे मराठी भाषेचे विकिस्त्रोत सांकेतिक स्थळ आहे. विकिस्त्रोत ग्रंथालये इतरही भाषांमध्ये निर्माण होत आहेत. विकिस्रोत बहुभाषीय सांकेतिक स्थळ • विकिस्रोत सांकेतिक स्थळांची यादी • ताज्या घडामोडी • विकिस्रोत - मुक्त ग्रंथालय |