Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यामुळे घरात मुलांमध्ये दबाव निर्माण केला जातो. प्रत्येक गोष्टीत त्यांनी पुढेच असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या अपेक्षेमुळे व तणावामुळे काही मुलं तर आत्महत्या करतात. काहींच्यामनात मनोवैज्ञानिक ताण निर्माण केले. ही आव्हाने आपण समजून घेतली पाहीजेत व त्यांचा सामनाही केला पाहीजे. ऐका आणि जास्त लक्ष देवून ऐका. प्रत्येक माणसात काहीतरी प्रतिभा आणि हुनर आहे. आपली हुनर आणि प्रतिभा ओळखा आणि आपलं | व्यक्तीमत्व खुलवा. तुम्हाला इतरांबरोबर स्पर्धा नाही करायची, इतरासारखंही नाही बनायचं. तुम्ही खास आहात. स्वत:ला विकसीत करत रहा. पुढे आणि पुढेच जात रहा. | तुम्हाला माहीती आहे का, की आजही भारत आणि आफ्रिका जेथे आदिवासी लोक राहतात, तेथे असल्या स्पर्धा नाहीएत. जे काही आहे ते मिळून मिसळून नाती सांभाळून राहतात. राग, इर्षा ,घृणा नाहीए. ते हिंसक नाहीत. ते खूप जास्ती अपेक्षा नाही ठेवत. ज्या काही जीवनातील गोष्टी त्यांना मिळतात त्याबद्दल ते कृतज्ञ, आनंदी आहेत. बेशक त्या गोष्टी आपल्या मापदंडा प्रमाणे प्रगतीशील नाहीत,नसतील ही