Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/89

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कदाचीत. परंतु अशी प्रगती काय कामाची? जी आमच्या मुलांना आजारी बनवते. आजकाल प्रदुषण आणि जंकफुड या नुकसान करणाच्या जेवण/पेय पदार्थ, बसून टी.व्ही. बघन, हे होतं. पोहणं, खेळणं, कमी झालय आणि त्यामुळे. युवकांच आरोग्य १ बिघडतं. श्रीमंताच्या घरातील मुलं जाड होतात. शेतात वापरलेल्या औषधामुळे, फवारणीमुळे आजारपणं वाढतात. आज घरात एक किंवा दोन मुले असतात. आई, वडील दोघेही कामाला जातात. घरी आजी आजोबा नाहीत. आई वडीलांमध्ये जर ताण-तणाव निर्माण झाला तर घरात कोणीच नसतं की ज्याच्याशी बोलता येईल. आजकाल व्यक्तीवाद वाढत चाललाय. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने स्वत:साठी जगू पहातोय. दुस-यांना समजून घेणे , दूसच्यासाठी काही करणे, निस्वार्थी बनणं, सहनशक्ती, मिळून मिसळू । न रहायची इच्छा, कौशल्यं कमी झालयं, या सगळ्या कारणांमुळे युवकांच्या मनात प्रचंड तणाव निर्माण झालाय. कुटुंबामध्ये तुटलेपण येते. काही लोक गावाकडून शहराकडे धावत आहेत. अशा परिवारांमध्ये असुरक्षितता