पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/87

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा बाहेर चोच्या करायला लागतात. काही मुलं तर हिंसा करण, हत्त्या करणं या गोष्टी करतात. काहीमुलं -मुली शरीराची विक्री करायला तयार होतात. चांगल्या नोक-या, चांगल्या जागा कमी आहेत. त्यामुळे घरात मुलांमध्ये दबाव निर्माण केला जातो. आजच्या वातावरणात वस्तूंना अधिक महत्व दिले जाते.चारीत्र्य किंवा मुल्यांना नाही. मानवी उपभोक्ता वादाने परिसिमा गाठलीय. या विषा पासून स्वत:ला वाचवणं अवघड बनतंय एका बाजूला महागड्या वस्तूंच्या जाहीराती, महागडी दुकानं तर दुस-या बाजूलाअध्र्याहून अधिक लोक गरीब आहेत. या सगळ्यामुळे तरुणांमध्ये असंतोष, हाव निर्माण होतेय. | तुमच्या साठी रोल मॉडेल खूपच कमी आहेत.आज खूप कमी नेते,शिक्षक,सामाजिक कार्यकर्ते असे आहेत ज्यांना पाहून युवक प्रामाणिकपणा व साधेपणा शिकू शकतील. याचा अर्थ तुमची जबाबदारी अधिक वाढते. तुम्हाला आदर्श बनायचं. आजकाल प्रतियोगीता आणि स्पर्धा खूप वाढलीय. कुटुंबामध्ये भिती निर्माण झाली आहे. आपला मुलगा नंबरात नाही आला तर काय होईल? चांगल्या शाळेत जागा कमी आहेत, चांगल्या नाक-या कमी आहेत. _ 81