पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९. लैंगिक परिपक्वता, लैंगिकतेची जाणीव आणि त्यात निमणि होणाशी आवड १० ते १९ या वयोगटातील शरीरात खूप बदल घडतातं. त्याचा परिणाम म्हणून लैंगिक भावनाही मनात निर्माण होतात. याच वयात प्रेमात पडावं वाटतं. काहींच्यावर जीव जडतो. सतत त्याबाबत विचार करावा वाटतो. त्याच व्यक्तीशी गप्पा माराव्या, सोबत बसून रहावं वाटतं. ज्याच्या विषयी प्रेम वाटत त्याला स्पर्श करावा ,त्याचं चुंबन घ्यावं लैंगिक भावना पण निर्माण होते, काही वेळा तर प्रेमा शिवाय सुद्धा लैंगिक भावना उत्तेजीत होवू शकते. यौता योन असं वाटतं की ही शरीराची गरज आहे,मागणी आहे. त्यांना रोखणे शक्य नाही, अवघड आहे. या वयांचे कित्येक लोक खास करुन मुलगे अशी लैंगिक नाती, शरीर संबंध करायला लागतात. अधिक तर कुटुंबात, समाजात, वर्गात लैंगिकतेवर मोकळ्या पणाने चर्चा करणे चुकीचे मानले आहे. त्याला बाद किंवा वाईट मानतात. तुम्ही मुलं त्याच्या विषयी खूप मोकळेपणाने नाही बोलू शकत. तुमच्यासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या पण असतात. तुम्ही या विषयी खूप कमी गोष्टी जाणता. परंतू तुमच्या अवती भवतीची माणसं लिंग आणि लैंगिकतेविषयी मौन बाळगतात. तुम्ही फक्त मित्रांशी _ 78.