पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/83

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुम्ही स्वत; पण सांगा की तुम्ही सुंदरका आहात ? मित्रांना पण लिहायला सांगा आणि मग हा चार्ट तुमच्या वर्गात , तुमच्या ग्रुपमध्ये जिथे बसता तेथे लावा. हा, हे तर करायचं आहे पण, काय करायचं या विषयावर आमचा अनुभव असं सांगतो की मैत्री करताना आपण जपूनच केली पाहीजे. चूकीचे मित्र करुन चुकीच्या दिशेने जावू शकतो. म्हणून जरा विचार करा. ख-या आणि चांगल्या मैत्रीत दबाव किंवा धोका देण्याला जागा आहे ? आम्हाला असं वाटतं बिलकूल नाही. पण मित्रांनो, कोणाच्या दबावाखाली काही करु | नका, जे तुम्हाला योग्य वाटेल ते करा. नाही तर नाही. आपण के लेल्या कामाचे फळ - आपल्यालाच भोगावे लागत. म्हणून ज्याची जबाबदारी स्वीकारु शकता तेच करा. पण मित्र योग्य काम करायला शिकवत असतील, चांगला सल्ला देत असतील तर जरुर त्यांचं ऐका.