पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विचार करा आणि बोला तुम्ही कोण आहे ?

तुमचे मित्र कसे आहेत ?

त्यांचं वागणं, बोलणं, चालणं जबाबदार व्यक्ती प्रमाणे आहे ? त्यांचा तुमच्यावर दबाव येतो? त्यांनी कसे कपडे घातले, सिगरेट ओढली तसे तुम्हाला करा म्हणतात ? मित्र परिवारात असा दबाव असणं चांगले आहे का ? जर असा दबाव अनुभवायला आला तर तुम्ही काय कराल ? का तुम्ही इतरांच्यावर दबाव टाकता ? तुम्ही स्वत: दादा, डॉन टाइप नाहीए ना ? सौंदर्याची तुमची काय कल्पना आहे ? तुम्हाला काय व्हायचे, झकपक, नट्टा पट्टा की एक चांगलं व्यक्तीमत्व की आणखीन काही? है । सौंदर्याची तुमची कल्पना डायरीत लिहून ठेवा. किंवा असं पण करुन बघा, एका चार्टवर लिहून ठेवा. मी सुंदर आहे कारण... । । । । । । । ।