पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३. आपले व्यक्तीमत्व आणि आपली वेगळी ओळख, | मुला मुलींची आपली | वेगळी ओळख होतेय. तुम्हाला वाटतं लोकांनी तुम्हाला तुम्ही म्हणुन ओळखावं कारण तुम्ही खास आहात. तुम्हाला वाटतं तुमचं कौतुक व्हावं, तुमचा सन्मान व्हावा. तुमचा आत्मविश्वास वाढतोय आणि सोबतच आत्मसन्मान देखील. परंतु तुमच्या आई वडीलांनी, शिक्षक किंवा इतर कोणी सर्वांसमोर तुमची चेष्टा केली, तुम्हाला ओरडले तर, तुमच्या वर उखडले तर तुम्हाला अजिबात आवडत नाही. स्वाभाविक आहे.तुमची स्वतंत्र ओळख असलीच पाहीजे. तुम्ही आपल्या कुटुंबांचा एक महत्वपूर्ण हिस्सा आहात.तुमच्यामध्ये क्षमता आहे. काही करुन दाखवण्याची इच्छा आहे, जिद्द आहे. ते आवश्यक आहे की लोकांनी तुम्हाला ओळखलं पाहिजे. तुमची इज्जत केली पाहीजे. लोक तुमची इज्जत तेव्हाच करतील जेव्हा तुम्ही स्वत:चा सन्मान कराल. आणि तुमचं वागण सन्मानासाठी लायक असेल. यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. मित्रांनो, मान सन्मान मागून मिळत नाही. किंवा जबरदस्तीने ही मिळवता येत नाही. परंतु हे ही विसरु नका जर तुम्हाला मान सन्मान केलेला आवडतो तर इतरांचा ही आपण मान केला पाहिजे. _ 72