Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जेव्हा विचार वाढायला लागतात तेव्हा जीभही बोलायला लागते, खुलायला लागते. तुम्ही आपलं मत मांडु इच्छिता. तुम्हाला वाटत असतं की लोकांनी तुमचं ऐकावं, कारण तुम्हाला वाटतंय की तुमच्याकडे सांगण्यासारखं बरंच काही आहे. तुम्ही संधी शोधत असता. अगदी वाद घालण्यासाठी सुद्धा तयार असता. तुम्हाला वाटतंय की घरामध्ये, शाळेत निर्णय घेताना तुम्हाला सामील करुन घेतलं पाहीजे. तुमचा सहभाग असला पाहीजे कारण तुम्ही आता लहान नाही आहात. काही मुलांना तर असे वाटते की फक्त त्यांनाच योग्य विचार करता येतो. त्यांनाच सगळे माहित आहे. सगळ्या सत्याचा पूर्ण ठेका त्यांनीच घेतलाय. हा अहंकार पण बरोबर नाही. काही विषयांच्या बाबतीत तुमचं वेगळे मत असु शकतं. ही तुमच्या परीपक्वतेची खुण आहे. जर असे आहे तर उत्तेजीत न होता दृढता पुर्वक आपले म्हणणे मांडा आणि खुले दिलाने दुस-याचे ही म्हणणे ऐका आणि मग विचारपुर्वक निर्णय घ्या. दृढता पुर्वक सांगा आणि नम्रता पुर्वक ऐका.