पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० % ते ४०% किशोरावस्थेतील मुले ही जाडेपणा मुळे आजारी बनली आहेत. आता हा आजार भारतातल्या श्रीमंत आणि मध्यम वर्गात वाढू लागला आहे. वाढुन घेवून जेवणे आवश्यक आहे. पालेभाजी किंवा फळभाजी मोड आलेलं कडधान्य किंवा डाळी आणि मग आवडी प्रमाणे भात भाकरी,चपाती , सिझनचे कोणतेही फळ अगदी पेरु,आवळा,चिंच,केळं अगदी रानमेवा सुद्धा. दुध, ताक, दही, लिंबू हे जेवणात असले पाहिजे. लिंबू ऐवजी आपणाकडे लोणचं वाढलं जातं, ते आवश्यक आहे. दिवसातून चार वेळा वरिल सगळे थोडे थोडे पदार्थ पोटात गेले पाहिजे. हे सर्व पदार्थ आपल्या घरात निर्माण होणा-या सांडपाण्यावर परसबाग निर्माण करुन आपल्या घराला लागणारा पोषण आहार आपण सहज निर्माण करु शकतो. अगदी घरच्या गच्चीत किंवा कुंडीत सुद्धा. त्यामुळे गरिबीचे कारण सांगून किंवा जागेचे कारण सांगुन आपण पौष्टीक जेवण यापुढे टाळणार नाही. | या वयात व्यायाम आवश्यक आहे.व्यायाम केल्याने मासपेशी मजबुत राहतात. शरिर वयोमानाप्रमाणे वाढीस लागेल. तुमच्या अंगी उत्साह आणि स्फूर्ती येईल. अलीकडे आपण मैदानावर कमी खेळतो. मैदानं रिकामी पडलेत. अभ्यासाचं ओझं वाढत आहे. टिव्ही किंवा कॉम्प्युटर पुढे दिवस वाया जातोय. खूप कमी मुलं मुली खेळात आणि 67