Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हे असे असेल, तर मग काय करूया ? । किशोरावस्थेत शरिर जेव्हा इतके बदलतेय तेव्हा त्याच्या देखभालीसाठी, वाढीसाठी तुमची जबाबदारी ही वाढते. तुम्ही जर तुमची जबाबदारी निभावली तरच शारिरिक दृष्टया आरोग्यदायी आणि ताकदवान बनु शकता. लहानपणी तुमचे जेवण, आरोग्य,स्वच्छता यावर आई लक्ष ठेवायची. आता तुम्ही मोठे झालात, आता स्वतःची जबाबदारी स्वतः घेतली पाहीजे. या वयात त्यासाठी काही ठोस निर्णय झाले पाहिजेत. शारिरिक सफाई प्रत्येक वयाची गरज आहे.या वयात स्वच्छता आत्यंतिक गरजेची आहे. खास करुन जननेंद्रीयाची स्वच्छता. | पाळी दरम्यान स्वच्छतेकडे खास लक्ष द्यावे लागते. स्वप्नदोष किंवा विर्यपतन होते म्हणून ही स्वच्छता गरजेची आहे. तुमचे जेवण अधिक पैष्टीक आणि वेळेवर झाले पाहीजे. आजकाल कचरा खादय विकले जातेय. जाहीराती ते तुमच्यावर लादतायत. पेप्सी, पिझा, बर्गर, चिप्स हे पदार्थ मजेदार आहेत,पण आरोग्यासाठी घातक आहेत. याच गोष्टी खात पित राहीलात तर वजन वाढेल पण ताकद कमी होईल. अमेरिकेत या गोष्टीमुळे | 66_