पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

शकते, तर काही मुलींमध्ये टेस्टोस्टेरॉन असू शकते. त्यामुळे काही मुलांना दाढी मिश्या कमी येतात. तर काही मुलींच्या चेह-यावर लव आलेल्या आपल्याला दिसतात. मित्रांनो, ही सर्व निसर्गातील विविधता आहे म्हणून निसर्गाची कमाल आहे. आपण सर्वजण एकाच फॅक्टरीत तयार झालो असतो तर एक सारखे नसतो का? आपण फॅक्रटरीत बनलेलो नाही म्हणूनच तर आपण प्रत्येक जण वेगळे आहोत. म्हणून विशेष आहोत. त्यामुळे तुमच्यातील काही बदल उशीरा झाले किंवा वेगळ्या पद्धतीने झाले तर घाबरून जाण्याचे काही कारण नाही. सांगा, सुंदरता म्हणजे काय ? शुक्रकोण ? किशोरावस्थेमध्ये शरिरा विषयीची आपली उत्सुकता आणि आकर्षण वाढत असते आपल्याला वाटत असते आपण चांगले, सुंदर आणि डौलदार दिसले पाहिजे. तासनतास काही जण आरश्या समोर उभे राहतात. नटणे, मुरडणे सुरु होते. सामाजिक कारणामुळे मुली नटण्या मुरडण्याकडे अधिक लक्ष देतात. शरिराविषयी निर्माण होणा-या या आकर्षणाला आणखी एक | कारण पण आहे. काही परिवारात पाळी दरम्यान स्त्रियांना अपवित्र आणि