पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अस्पृश्य मानले जाते. पाळी दरम्यान मुलींना दुखत असते. आणि अस्वस्थ वाटत असते. प्रवास करणे, खेळणे, उड्या मारणे शक्य होत नाही. उड्या मारण्यामध्ये अडचणी येतात. त्यामुळे पाळी दरम्यान मुलींना ताण येतो. या सगळ्या कटकटी मुळे त्या आपल्या शरिराचा राग करु लागतात. त्यामुळे मानसिक आणि शारीरीक तणाव वाढतात, ही गोष्ट योग्य नाही. व्यक्तीमत्व विकासासाठी ही गोष्ट हानिकारक आहे. आपल्या शरिराविषयी प्रेम आणि मैत्री वाटली पाहिजे. शारिरिक सौंदर्याविषयी सजग होणे स्वाभाविक आहे. पण गरजे पेक्षा जास्त लक्ष देवून त्यात गुंतुन पडले तर अडचणी वाढू शकतात. जसे चेहयावर येणा-या तारुण्य पिटीका हार्मोन मधल्या बदलांनी येत असतात. काही दिवसांनी त्या गायब पण होतात. त्यामुळे अस्वस्थ होण्याची काही गरज नाही. परंतू हो, खूपच जास्त येत असतील तर घरातील जेष्ठ महीला, डॉक्टर यांचा सल्ला घ्यावा. आजकाल किशोरावस्थेतील मुला-मुलींच्या सुंदर दिसण्याच्या इच्छ चा गैरफायदा मोठ्या कंपन्या पैसा मिळवण्यासाठी करतात. जाहीरातींचा आधार घेऊन आपल्या वस्तु तर विकतातच पण त्याचबरोबर सौंदर्याच्या सफ८ चुकीच्या कल्पना आणि विचित्र निश्वार व्याख्याही आपल्यावर लादल्या जातात.