Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आम्ही सगळेजण जे या वयातून गेले त्यांनी या वयातील जोश, मस्ती खूप छान अनुभवली आहे. शरिरामधील प्रचंड उलथा पालथ, चेहरा आणि डोळयातील चमक, धमण्यांमधून वाहणारे गरम आणि सळसळणारे रक्त. मनात आशा, उल्हास, उर्जा. भिती, हार निराशा याच्याशी काहीही संबंध नाही. संपूर्ण आयुष्य उत्सुकता, जिज्ञासा आणि नाविन्याच्या शोधाने भारलेले आणि आयुष्य म्हणजे नुस्ती मौज मस्ती. हे वय अगणित रस्ते, आव्हाने आणि शक्यतांनी भारलेले जेथे तुम्हाला निर्णय करायचा आणि आव्हानावर विजय मिळवायचा. परंतु या अवस्थेचा एक दुसरा पण पैलू आहे. कारण या वयातील बदलाची गती प्रचंड तीव्र आहे. ब-याच नव्या गोष्टी घडतात. त्यामुळे अनेक शंका आणि अस्वस्थता पण सोबत असते. _ 531