पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किशोरावस्था आणि मुलं व मुली त्यांची ही गोष्ट १० ते १९ वर्ष वयोगटाला म्हणतात किशोरावस्था. म्हणजे तारुण्यात पदार्पण, इंग्लीश मध्ये या वयोगटाला Adolescent म्हणजे लॅटीन शब्द आहे Adolescere म्हणजे वाढणे, विकसीत होणे, परिपक्व होणे. (कच्चे फळ परिपक्व होते किंवा पिकते तसे ) ही अवस्था प्रवास आहे,बालपणाकडून तारुण्याकडे, या प्रवासाची गती प्रचंड आहे. या वयोगटातील व्यक्तींकडे नवीन आणि चांगले करण्याची हौस, उर्जा, स्फुर्ती आणि उत्साह असतो. तसेच नविन गोष्टी आजमावयाची त्यांची इच्छा आणि जोशपण असते. या वयोगटातील मुलं, मुलं नाही राहत व वयस्कर पण नाही होत. बालपण आणि तारुण्याच्या मधला हा टप्पा असतो.