पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

  • पूर्ण जबाबदारीने आणि स्वतंत्रपणे आपण कधी कोठे कोणाबरोबर लैंगिक संबंध ठेवायचे हे ठरविण्याचा अधिकार
  • आपल्या लैंगिक आणि प्रजनन आरोग्याबाबत जोर जबरदस्ती शिवाय निर्णय घेण्याचा अधिकार,
  • आपला जीवनसाथी निवडण्याचा आणि लग्न करण्याचा अधिकार, मुले होवु देणे, न होवु देणे, कधी आणि किती मुले होवू दयावीत हे ठरविण्याचा अधिकार.
  • या संबंधातील सर्व प्रकारच्या हिंसेपासून मुक्तता करुन घेण्याचा अधिकार,

हे सर्व अधिकार तुम्हा छोटया किशोरी मित्रांना मैत्रींनींना आहेत. तुम्ही ही लैंगिकता आणि प्रजनना। संदर्भातील माहिती आणि सेवा मागु शकता. तुम्हाला कोणी नकार नाही देवू शकत.आपल्या अधिकारांसाठी इतरांना ते । अधिकार मिळावेत म्हणून प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे. लैंगिक हिंसा लैंगिक हिंसा अनेक प्रकारची आहे. ही हिंसा मुले मुली, स्त्री-पुरुष कोणाच्याही बाबतीत असु शकते. सर्वसाधारणपणे मुली आणि स्त्रिया यांच्या बाबत हिंसा अधिक घडतात. अपमानजनक शब्द/भाषा, इशारे, इच्छेशिवाय स्पर्श या सर्व लैंगिक हिंसा आहेत. _ 144