पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिक आरोग्य - आरोग्य म्हणजे शरीर, मन, भावना, खुश आणि आनंदी असले पाहीजे. हीच गोष्ट जेव्हा लैंगिक जीवनाला लागू होते त्याला म्हणतात लैंगिक आरोग्य. लैंगिक आरोग्यासाठी आवश्यक आहे समानतेवर आधारलेले लैंगिक जीवन , जे आपल्याला सुखी करेल, आयुष्यात वाढायला ,फुलायला मदत करेल. लैंगिक आरोग्यासाठी खालील गोष्टी आवश्यक आहेत: लिंग आणि लैंगिकता याबाबत पूर्ण माहीती असणे. लैंगिक संबंध सुरक्षित असला पाहीजे. त्यामध्ये कुठलाही संसर्ग किंवा धोका असता कामा नये. स्वत:वर पूर्ण विश्वास असला पाहीजे आणि आपली गोष्ट समोरच्याला पूर्ण विश्वासाने सांगता आली पाहीजे. नात्यामध्ये मैत्री आणि विश्वास हवा. कोणत्याही प्रकारे हिंसा, जबरदस्ती, जोर असता कामा नये. लैंगिक संबंधासाठी तुम्हाला नाही म्हणण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपले लैंगिक जीवन मुक्तपणे अनुभवण्याचे स्वातंत्र्य हवे. तोडून मोडून लाजीरवाणे होण्याची वेळ येता कामा नये. _142_