पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपल्या लैंगिक वर्तनाला आपण स्वतःच जबाबदार असतो. याची जबाबदारी दुसरे कोणी घेवु शकत नाही. जर शारिरिक दृष्ट्या तुम्ही लैंगिक जीवन जगण्याच्या लायक झाला असाल तर त्याची जबाबदारी उचलण्याची तुमची लायकी असली । पाहिजे. तुम्हाला विचार पूर्वक निर्णय करावा लागेल की तुम्हाला या नात्यात लैगिक संबंध ठेवायचा आहे किंवा नाही, असेल तर केंव्हा आणि कसा? जर तुमचा हेतु स्पष्ट आणि साफ असेल तर तुमचे वर्तनही तसेच असले पाहिजे. समोरच्याला ते तसे जाणवले पाहिजे. तुम्हालाच तुमची भूमिका अस्पष्ट असेल तर त्याचा गैरफायदा समोरचा घेवु शकतो. क्या है प्यार, बता मेरे यार तुमच्या मते प्रेम म्हणजे काय?तुमचं कोणावर प्रेम आहे? का करता? तुमच्या मते प्रेमाचा अर्थ काय आहे?दुस-याला समजुन घेणे? त्यांना महत्व देणे ? आपल्या मनातल सगळ त्याला सांगण? त्याला संधी देणे?त्याची आवड निवड समजुन घेणे?त्याच ही कोणी तरी आहे याची त्याला जाणिव देणे?त्याला सुरक्षित करणे ?त्याच्या रडण्यासाठी खांदा बनणे की त्याच्या हसण्याचे साक्षीदार होणे की आणखीन काही ? 135