Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सामावुन जाते. ही घनिष्ठता अनोळखी, माणसांसोबत करणे योग्य आहे? पैसे देवुन आनंद किंवा संभोग विकत घेणे बरोबर आहे? यामुळे खरेच आनंद मिळेल? किती वेळासाठी? आणि त्यानंतर ? मित्रांनो, आता हे स्पष्ट झाले आहे की लैंगिकता आणि लैंगिक आनंद याबाबत समज वाढवावीच लागेल. ब-याचश्या क्रिया या लैंगिक असतात. त्यापुळे ही आनंद मिळू शकतो. फक्त लैंगिक संबध (लिंग, योनी, गुद्दार या सोबत केलेला संबंध) किंवा संभोग म्हणजे लैंगिक संबंध नव्हे; त्यातूनच फक्त आनंद मिळतो असे नाही. काही लोकांना लैंगिक संबंधाने इतका आनंद मिळत नाही. जितका त्यांना एकमेकांना कुरवाळण्याने, आलिंगणाने, चुंबन घेण्याने किंवा एकत्र राहण्याने मिळतो. काही युवा आनंद, उत्तेजनाच्या शोधामध्ये आपली मर्दानगी मित्रांना दाखवण्यासाठी वेगवेगळ्या मैत्री जोडत असतात. काही या बद्दल फुशारकी मारतात. आपण हे समजुन घेतल पाहीजे की जोडीदार बदलण्याने समाधान मिळत नाही. जर तुम्ही एकाचे चांगले मित्र नाही बनु शकला तर तुम्ही कहा जणांचे साथीदार कसे बनणार? आनंद, समाधान आणि चांगल्या नात्याच्या शोधा मध्ये साथीदार बदलण्यापेक्षा स्वतःला बदलण्याची गरज आहे का ते बघा. __134