पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ना विचार करा | खुप सारी तथाकथित प्रेमाची नाती,जोरजबरदस्ती ची । नाती असतात.देण्याऐवजी घेण्याचाच विचार मनात असतो. ऐकण्या ऐवजी बोलण्याचीच घाई असते. आपली मर्जी, आपली आवड आपण दुस-यावर लादत असतो.खुप सा-या। नात्यात भेदभाव,उच्च निच्च, रस्सी खेच असते. त्या नात्यात प्रेम कधी दिसतच नाही. तक्रारी सुरु आहे हे लक्षात येते. तुम्ही मित्रां जवळ समाधान मिळवण्यासाठी जाता आणि नविन घाव ,नविन प्रश्न घेवुन येता.आमच्या मते असमानतेवर आधारलेली आणि जोरजबरदस्तीने टिकवलेली नाती ही फक्त | अर्थशुन्य होत नाही तर खतरनाक होतात. असमानतेवर आधारलेल्या नात्या पासुन दुर राहणं चांगल. दबाव, कमीपणाची भावना, दुस-याने दिलेले हुकम पाळत नातं टिकवणं म्हणजे प्रेम नव्हे म्हणुन या सर्वा बाबत विचार करावा लागेल.चर्चा करावी लागेल. प्रेमाच्या प्रत्येक नात्यात लैंगिकता असणे गरजेचे नाही. एकमेकांच्या सोबत बसणे, गप्पा मारणे,मिळुन कविता म्हणणे, काही वाचन करणे,दूरवर फिरायला जाणे खेळणे, सिनेमाला जाणे यातहीआनंद आहेच की. ॐ शत्य तर हे आहे की कित्येकदा पूर्ण तयारी १ ॐ आणि संमती शवाय लैंगिक संबंध केल्या मुळे अनेक सुंदर नाती संपतात. _ 136