पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लैंगिकता आणि लिंग समजुन घ्या,गप्प राहु नका लिंग आणि लैंगिकता आमच्या जीवनाचा महत्वपुर्ण हिस्सा आहे.या शिवाय आपण या जन्माला आलो नसतो,आपला परिवार ही नसता आणि आपले जीवन ही नसते. लिंग आणि लैंगिकता या महत्वपुर्ण । विषयावर मोकळेपणाने सर्व ठिकाणी खुली चर्चा केली जात नाही.लपून छपून गोष्टी केल्या जातात. जणु काही ही चुकीची किंवा घाणेरडी गोष्ट बोलत आहोत. एक नैसर्गिक आणि सुंदर गोष्ट अजब, हिंसक, घाणेरडी आणि चुकीची ठरवली गेलीय. D लिंग आणि लैंगिकतेचा अर्थ, महत्व आणि समज सर्वांसाठी एकसारखी नाही. काही लोकांच्या मते फक्त मुलांना जन्माला घालण्यासाठीच त्यांचा उपयोग झाला पाहिजे. आनंदासाठी लैंगिकता अनुभवणे हे लोक चुकीचे समजतात. काही लोक आनंदासाठी लैंगिकता अनुभवणे चुकीचे समजत नाहीत. 117