पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तुमच्या विचार करण्याच्या पद्धती मध्ये फरक पडलेला दिसतो. या सामाजिक भेदभावाचा परिणाम फक्त मुलींवरच नाही, तर कुटुंबावर, समाजावर व देशावरही पडताना दिसतो. जर आपण खोलवर जावून विचार केला तर मुलांवरही ब-याच गोष्टी लादल्या जातात. त्यांना मुक्तपणे राहू दिले जात नाही. त्यांना जबरदस्तीने मर्दानगीच्या नावाखाली मजबूत, कणखर आणि हिंसक बनविले जाते. जर एखादया मुलाला मारामारी करता येत नसेल, आवडत नसेल तर त्याला पुरुषासारखं वागत नाही म्हणून चिडवलं जातं. या पद्धतीचा विचार आणि संस्कार याचा परिणाम म्हणून समाजातील सर्व चुकीची आणि जोखमीची कामे मुलगे करतात. सिगरेट ओढण , दारु पिण, नशापाणी करणे, अपघात करणे, अपराध करणे, हिंसा करणे. पुरुषांचे किंवा मुलांचे असले वागणे हे नैसर्गिक नाही, स्वाभाविक नाही. निसर्गाने त्यांना असे नाही बनवले. निसर्गाने पुरुषांना, मुलांना जर हिंसक बनविले असते तर मग एकही पुरुष, मुलगा कोमल आणि अहिंसक राहीला नसता. तर याच समाजात म.गांधी, म.फुले ,मार्टीन ल्युथर किंग या सारखे पुरूषही जन्माला आले नसते. | सामाजिक लिंगाची अवधारणा गेल्या ३०-३५ वर्षात वाढताना दिसते. या अवधारणे मुळे जैविक आणि सामाजिक कारणांना स्वतंत्र 99