पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

करुन तपासणे शक्य झाले आहे. आणि आवश्यकही झाले आहे. कारण समाज प्रत्येक असमानतेचा दोष हा निसर्गातील देवाला किंवा जैविक कारणांना देत असतो. घर आणि समाजातील लोक म्हणतात मुली झाडावर नाही चढू शकत , शिट्टी नाही वाजवू शकत , रात्री- बेरात्री एकटया नाही फीरु शकत,निसर्गाने मुलींच्या शरीरामध्ये हे फरक घडविलेले नाहीत. निसर्ग किंवा शारीरीक बनावट फक्त एवढच सांगते की स्त्रिया जर इच्छा असेल तर गर्भ धारणा करु शकतात, बाळाला दूध पाजू शकतात. निसर्गाने स्त्रियांनी भांडी घासावीत, स्वयंपाक करावा, सर्वांची सेवा करावी यासाठी काही विशेष अवयव स्त्रियांना दिलेले नाहीत. म्हणजेच या सर्व कामांचा संबंध निसर्गाशी नाही तर हे सर्व कायदे कानून समाजाने बनविले आहेत. याचाच अर्थ ते बदलले जावू शकतात. समानता प्रस्थापित होवू शकते. खूप साच्या उच्च निचता किंवा असमानता या नैसर्गिक किंवा देवाने बनविल्या आहेत आणि त्या बरोबर आहेत, असे ठसविले जाते. जसे की जातीवाद. जातीप्रथेच्या बाबत सांगतात की ब्राम्हण हे। ब्रम्हाच्या मेंदूतून तयार झाले, वैश्य पोटातुन तयार झाले , क्षत्रिय बाहूतून व क्षुद्र पायातून. म्हणजेच जात देवाने बनविली.त्यांच्या मते या परंपरा विषयी प्रश्न उपस्थित करणे चुकीचे आहे _ 100।