पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

लिंग म्हणजेच सोशल जेंडर. उदा. मुलींनी आणि स्त्रीयांनी घरात राहीले पाहीजे हा नियम बनविण्यात आला. मुलगा बाहेर जाईल, मन मानेल तेव्हा परत येईल किंवा मुलीला खाणं किंवा जेवण मुलांपेक्षा कमी दिलं जाईल. मुलाला चांगल्या शाळेत पाठविले जाईल, तो मोठा होवून कुटुंबाचा व्यवसाय सांभाळेल किंवा चांगली नोकरी करेल. मुलीच्या शिक्षणाकडे फार लक्ष दिलं जाणार नाही. हे सर्व भेदभाव निसर्गाने नाही बनविले समाजाद्वारे निर्माण केलेली ही परीभाषा मुलगा-मुलगी, स्त्री-पुरुष यांच्यामध्ये असमानता निर्माण करते. समाज म्हणतो मुलगा किंवा पुरुष उत्तम आणि वरचढ आहे. तर मुली हया कमी, दुय्यम आणि कमकुवत आहेत, स्त्रिया सत्ताहीन आहेत, पुरुष सत्तावान आहेत.पुरुष आत्मनिर्भर आणि स्वतंत्र आहेत. स्त्रिया पराधीन आहेत. त्यामुळे मुली आणि स्त्रिया विविध प्रकारच्या हिंसेच्या बळी ठरतात. त्यांचे कौशल्य विकसित होवू दिले जात नाही. त्यांना संधी दिली जात नाही. एकाच घरातील मुलगे । मुक्तपणे वाढताना फुलताना दिसतात. आणि मुली मात्र कुढत जगताना दिसतात, दबावाखाली दिसतात. दोघांनाही सारखे अधिकार दिले जात नाहीत म्हणून तुम्ही मुली मुले एकसारखे वाढताना दिसत नाहीत . ४ ।।