Jump to content

पान:संवाद माझा माझ्याशी...ओळख स्वतची (Sanwad Maza Mazyashi...Olakh Swatachi).pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युवक आणि युवती यांची गोष्ट वेगळी का? लिंग शमभाव (जेंडर) म्हणजे काय ? समाजात मुलगा मुलगी, स्त्री पुरुष यांची भाषा आणि ओळख वेगळी असते. एक ओळख आहे ती नैसर्गिक निसर्गाने ती केली. या मुळे मुलगा म्हणजे ज्याला लिंग आहे,दोन अंडाशय आहे. आणि मुलगी म्हणजे जिला योनी आहे. काही लोकांत हे लैंगिक अवयव मिश्र असू शकतात. मुलांमुलींमध्ये वेगवेगळी संप्रेरके असतात. ज्यामुळे मुलगा मोठा झाल्यावर पुरुष बनतो. मुलगी मोठी झाल्यावर स्त्री बनते. स्त्रियांच्या शरीरात योनी, स्तन, गर्भाशय असतात, तिच्या शरीरात मुल वाढणार असतं. ती मुलाला जन्म देते. |