Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ संतवचनामृत : ज्ञानदेव. ६५९ वीकृति शून्याचार । हा नाहीं ज्या विचार । न घडे न घडे साक्षात्कार । जाण सर्वथा तया नरा॥ आधीं शून्याची शोधणी केली । मग सद्वस्तु प्राप्ति झाली। अमृतवेळाची बोली । बोलतां नये ॥ आधी शून्य ते शुभ्रवर्ण । मध्ये श्वेत रचिले जाण । अर्घ्य शून्य ते ताम्रवर्ण । प्रत्यक्ष जाण दिसतसे ॥ महाशून्याचा वर्ण निळा । अव्यक्त तेजाचा ओतिला गोळा। ग्रासुनी ठेला भूगोळा । योगी डोळां पाहती॥ ऐसे शून्याचे नाही ज्ञान । तंववरी अवघेच अज्ञान । जनीं अवघा जनार्दन । अज्ञान सज्ञान काय बोलूं॥ ब्रह्मज्ञानाची किल्ली । सांगितली एकचि बोली। निवृत्तिराजे बोलविली बोली । तेचि बोली बोलिलों ॥ ६०. शून्याच्या भुवनांत अविनाशस्वरूपाचे दर्शन. शून्याचे भुवनीं स्वरूप अविनाश । प्रणवी पुरुष दिसतसे ॥ निळा रंग देखे सर्वांचे देखणीं । चैतन्यभुवनी समरस ॥ ज्ञानदेवा ध्यान सच्चिदानंदाचें । सर्व ब्रह्म साचे येणे येथे ॥ ६१. शून्य निरशून्य दोन्ही गेल्यावर निजवस्तूची प्राप्ति. चहूं शून्या औरुते महाशून्या परुते। सर्वांसी पहाते तेचि ते गा॥ दिसे तेही शून्य पहा तेचि शून्य । देहामाजी निरंतर भिन्न रूप ॥ शून्य निरेशून्य दोन्ही हारपली । तेथूनि पाहिली निजवस्तु ॥ ध्येय ध्यान ध्याता निरसूनि तीन्ही । झालो निरंजनी आतिलीन ॥ ज्ञानदेव म्हणे अनुभवी तो जाणे । गुरुमुखे खूण सांगितली॥ १ शेवटचें. २ ओंकार. ३ अलीकडचें. ४ पलीकडचें. ५ शून्याचा अभाव. .