________________
६५९] प्रातिभश्रावणादर्श. ५६. अमोलिक ररनाची जोड. अमोलिक रत्न जोडले रे तुज । कां रे ब्रह्मबीज नोळखसी ॥ न बुडे न कळे न पिये चोरा । ते वस्तु चतुरा सेविजेसु ॥ ज्ञानदेवो म्हणे अविनाश जोडले। आणुनि ठेविलें गुरुमुखीं ॥ ५७. सुढाळ ढाळाचे अष्टपैलू मोती. सुढाळ ढाळाचे मोतीं । अष्टै अंगे लवै ज्योती । जया होय प्राप्ति । तोचि लाभे ॥ हातींचे निधान जाय । मग तूं करिसी काय । पोळलियावरि हाय । निवऊ पाहे ॥ अमृते भोजन घडे । कांजियाने चूळ जोडे । मग तये चरफडे । मिती नाहीं ।। अंगा आला नाहीं घावो । तंव ठाकी येक ठावो। बाप रखुमादेवीवर । विठ्ठलु नाहो ॥ ५८. लक्ष मोलाने मोत्यांच्या लेण्याची प्राप्ति. सुखसोज्वळ मोतियाचे लेणे । दिधलें जॉईजणे बाईये वो ॥ देशी नाही देशा उरी नाहीं । हार्टणी नाही ते पाटणी नाहीं॥ लक्षाचेनि लाभे जोडले निधान । बाप रखुमादेवीवरा श्रीविठ्ठलु जाण ॥ ५९. ज्याने शून्य शोधिलें नाही त्याचे जिणे केवळ पशूचे होय. शुन्य शोधिले नाही जेणे । काय विवरण केले तेणें। अज्ञानपणे फुगणे । गाढव जिणे पशूचें ॥ १ सेवन कर. २ सतेज. ३ स्वरूप, आकार. ४ भरणे. ५ गणना. ६ नवरा. ७ जाणारे. ८ बाजार. ९ शहर.