________________
६६५] प्रातिभश्रावणादर्श. ६२. "डोळांचि पहा डोळां." डोळांची पहा डोळां शून्याचा शेवट । निळबिंदु नीट लखलखीत ॥ विसावों आले पातले चैतन्य तेथे । पाहे पां निरुते अनुभवे ॥ पार्वतीलागी आदिनाथे दाविलें। ज्ञानदेवा फावले निवृत्तिकृपा ॥ ६३. "ज्ञानदेवा नयन निवृत्ताने दाविला." स्वरूपाचे ध्यानीं निरंजन पाहिले । डोळ्याने दाविले चराचर ॥ आतां माझे नयन नयनी रिघों पाहे । नयना नयनीं राहे नयनचि ॥ नदेवा नयन निवृत्तीने दाविला । सर्वांठायीं झाला डोळां एक॥ ६४. ज्योतीपलीकडील ज्योतांचे दर्शन. डोळियांत डोळा काळियांत काळा । देखण्या निराळा निळारूप॥ ब्रह्मतत्त्व जाणे ज्योतिरूपें सगळा । ज्योतीही वेगळाज्योती वसे ॥ ज्ञानदेव म्हणे देवा ऐसी ज्योती। अर्धमात्रा उत्पत्ति सा जीवां। ६५. "माझ्या शरीरी ज्योतिलिंग उगवले." अगाधपण माझे अंगी बाणले । वरपडे देखिले मृत्तिकालिंग॥ त्यासी चैतन्य नाहीं गुण नाहीं । चळण नाहीं गुण रूप नाहीं ॥ माझ्या शरीरीज्योतिलिंग उगवलें। अगाध कवळिले हस्तेंवीण ॥ बाप रखुमादेविवरु ज्योतिलिंग विश्वनाथ । तेणे माझा मनोरथ पुरविला गे माये॥ १ चांगले, खरोखर. २ खाधीन झालेलें. ३ कवटाळणे.