Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०१ openvirtinia aathi ६९५] देव आणि भक्त. नामदेवासाठी जेवी दहीभात । न पाहे उचित आन दुजें ॥ गोरियाचे घरीं स्वये मडकी घडी। चोखियाची वोढी गुरेढोरे ॥ सांवत्या माळ्यासी खुरपूं लागे अंगें । कबीराचे मार्गे शेले विणा॥ रोहिदासासवें चर्म रंगू लागे । सजनकसायाचे अंगे मांस विकी॥ नरहरि सोनारा धडूं कुंकू लागे । दामाजाचा वेगें पाडेवार ॥ जनाबाईसाठी वेचितसे शेणी । एकाजनार्दनी धन्य महिमा ॥ ९३. सांवता, चोखामेळा इत्यादि संतांचा उल्लेख. खुर्पू लागे सांवत्यासी । न पाहे यातीसी कारण ॥ घडी मडके कुंभाराचें। चोखामेळ्याचे ढोर वोढी ॥ सजनकसायाचे विकी मांस । दामाजीचा दास स्वये होय ॥ एकाजनार्दनीं जनीसंगें। दळू कांडूं लागे आपण ॥ ९४. भक्तांच्या अगोदर देव कोठे होता ? आधीं देव पाठी भक्त । ऐसें मागे आले चालत ॥ हेही बोलणेची वावं। भक्ता आधी कैंचा देव॥ भक्त शिरोमणि भावाचा । देव लंपट जाला साचा ॥ भक्तासाठी अवतार । ऐसा आहे निर्धार ॥ वडील भक्त धाकुला देव । एकाजनार्दनीं नाहीं संदेह ।। ९५. " भक्त वडील देव धाकुला." भजन भावाते उपजवी । देव भक्तांत निपजवी ॥ ऐसा भजनेंचि देव केला । भक्त वडिल देव धाकुला ॥ भक्ताकारणे हा संकल्प । भक्त देवाचाहि बाप ॥... । १ महार. २ व्यर्थ. ३ आसक्तं.