Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२ संतवचनामृत : एकनाथ. [६९५ देव भक्ताचिये पोटीं । जाला म्हणोनि आवड मोठो ॥ एकाजनार्दनी नवलावो । भक्तचि कैसा जाला देवो ॥ ९६. जसें सगुणानंतर निर्गुण, तसाच संतानंतर देव. संत आधीं देव मग । हाचि उमग आणा मना ॥ देव निर्गुण संत सगुण । म्हणोनि माहिमान देवासी ॥ नामरूप अचिंत्य जाण । संती सगुण वर्णिले ॥ मुळी अलक्ष लक्षा नये । संती सोय दाविली ॥ एकाजनार्दनीं संत थोर । देव निर्धार धाकुला ॥ ९७. संतांच्या पोटांत देव वसतो; देवाच्या पोटांत संत असतात. संतापोटी देव वसे । देवापोटी संत असे ॥ ऐसा परस्पर मेळा । देव संताचा अंकिला ॥ संताठाई देव तिष्ठे । देव तेथे संत वसे ॥ .. एकाजनार्दनीं संत । देव तयाचा अंकितै ॥ ९८. संतांच्या अंकावर देव वसतो; व देवाच्या अंकावर संत बसतात. संताअंकी देव वसे । देवाअकी संत बैसे ।। ऐशा परस्परे मिळणी । समुद्र तरंग तैसे दोन्ही ॥ हेमअलंकारवत । तैसे देव भक्त भासत । पुष्पी तो परिमळ असे । एकाजनार्दनी देव दिसे ॥ ९९. भक्तांचे चरण चुरावयास देव घांवतो. मिठी घालूनियां भक्तां । म्हणे शिणलेती आतां ॥ धांवे चुरावयाँ चरण । ऐसा लाघवी आपण ॥ १ मार्ग. २ स्वाधीन. ३ सोनें. ४ सुवास. ५ चेपणें, दाबणे.