Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

L a mm -JLLLLLLLLL...


माना

- २०० संतवचनामृत : एकनाथ. [६८९ . र एका जनार्दनीं । करी रामनामध्वनि । कवल्याचा दांनी । रक्षी तुज निर्धारे ॥ ९०. भक्तांचे सर्व दुःख देव निवारण करितो. भक्तालागी अणुमात्र व्यथा। ते न साहवे भगवंता॥ करुनी सर्वांगाचा वोढा । निवारीतसे भक्तपीडा ॥ होउनी भक्ताचा अंकितु । सारथीपणे तो करीतु ॥ प्रल्हादासी दुःख मोठे । होतांची काष्टी प्रगटे ॥ ऐसा अंकित चक्रपाणी । एका शरण जनार्दनीं ॥ ९१. दासास जडभारी पडले असतां नानाप्रकारें देव संरक्षणास धांवतो. दासासी संकट पडतां जडभारी । धांवे नानापरी रक्षणार्थ ॥ पडतां संकटी द्रौपदी बहीण । धांवे नारायण लवलाहे ॥ सुदामियांच दरिद्र निवेटिलें। द्वारकेतुल्य दिले ग्राम त्यासी। अंबऋषीसाठी गर्भवास सोशी । परिक्षितीसी रक्षी गर्भामाजी ॥ अर्जुनाचे रथीं होउनी सारथी । उच्छिष्ट भक्षिती गोवळ्याचें ॥ राखितां गोधने मेघ वरुषला । गोवर्धन उचलिला निजबळे ॥ मारुनि कलासुर सोडिले पितर । रक्षिले निर्धारे भक्तजन ॥ एकाजनार्दनीं आपुले म्हणवितां । धांवे हरि सर्वथा तयालागीं ॥ ९२. ज्ञानदेवादिसंतांबद्दल देवानें कोणकोणते चमत्कार केले ? ज्ञानराजासाठी स्वयं भिंत वोढी। विसरूनि प्रौढी थोरपण ॥ तो हा महाराज चंद्रभागेतीरीं । कट धरुनि करीं तिष्ठतसे ॥ १ दान देणारा. २ नाहींसें करणे. - - -