________________
१९४ संतवचनामृत : एकनाथ. [६६८ आहे तुमचे हातीं । म्हणोनि येतो काकुलती ॥ एकाजनार्दनी म्हणे थारा । संती द्यावा मज पामरा ।। ६९. संतांच्या सेवेवांचून मला दुसरा हेतूच नाही. संताचिये द्वारी होईन द्वारपाळ। न सांगतां सकळ करीन काम ॥ तेणे माझ्या जीवा होईल समाधान। यापरते साधन आणिक नाहीं॥ शेष उष्टावळी काढीन पत्रावळी । पूर्वकर्मा होळी सहज होय ॥ एकाजनार्दनी हेचि पैं मागत । नाही दुजा हेत सेवेविण ॥ ७०, संतसेवा हेच नामश्रद्धेचे वर्म होय. वेदाभ्यास नको सायास ज्योतिष । नामाचा तो लेश तेथे नाहीं॥ बहुत व्युत्पत्ति सांगसी पुराण । व्यर्थ ते स्मरण नाम नाहीं॥ अनंत है नाम जयापासुनि जाले । ते वर्म चुकले संतसेवा ।। संतांसी शरण गेलियावांचुनि । एकाजनार्दनीं न कळे नाम ॥ ७१. भलत्या भावाने संतांची सेवा केली तरी ती देवास मान्य होते. जया जैसा हेत । तैसा संत पुरविती ॥ उदारपणे सम देणे । नाहीं उणे कोणासी ॥ भलतिया भावे संतसेवा । करितां देवा माने ते ॥ एकाजनार्दनी त्यांचा दास । पूर्ण वोरस कृपेचा ।। ७२. संतसमुदाय भेटला हा आजचा भाग्याचा दिवस ! धन्य दिवस जाहला । संतसमुदाव भेटला ॥ ज्ञान.२पान्हा.