Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

संतांची लक्षणे. १९५ _ कोडे फिटले जन्मांचे । सार्थक जाहलें पैं साचें ॥ आज दिवाळी दसरा । संतपाय आले घरा ॥ एकाजनार्दनी जाहला । धन्य दिवस तो भला ॥ ७३. वैष्णवांचे चरण देखिले असतां त्रिविधतापांची बोळवण होते. धन्य आज दिन संतद्रुशनाचा। अनंतजन्मांचा शीण गेला॥ मज वाटे त्यांसी आलिंगन द्यावें। कदा न सोडावे चरण त्यांचे ॥ त्रिविधतापांची जाहली बोळवण । देखिल्या चरण वैष्णवांचे ॥ एकाजनार्दनीं घडो त्यांचा संगान व्हावा वियोग माझ्या चित्ता॥ ७४ संतसंगाने आनंदाचे पूर लोटतात. भाग्याचा उदय झाला। संतसंग मज घडला॥ तेणे आनंदाचे पूर लोटताती निरंतर ॥ प्रेम सप्रेम भरते। अंगी उतार चढते ॥ आली आनंदलहरी । एकाजनार्दनीं निर्धारी॥ ७५. संतसंग हीच कैवल्याची राशि होय. आजी सुदिन आझांसी । संतसंग कैवल्यरासी॥ हचि आमुचे साधन । आणिक नको आम्हां पठन ॥ वेदश्रुति पुराण मत । संतसेवा ते सांगत ॥ जाणोनि विश्वासिलो मनीं । शरण एका जनार्दनीं। १ सांकडे, इच्छा. २ निरसन. ३ लाट,