Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६६८] संतांची लक्षणे. 20३ ६५. जे पोटासाठी संत होतात त्यांचा उपदेश कामास येत नाही. होती पोटासाठी संत । नाहीं हेत विठ्ठली ॥ तयांचा उपदेश नये कामा । कोण धर्मा वाढवी ॥ घालुनी माळा मुद्रा गळां । दाविती जिव्हाळा परिवरी॥ एकाजनार्दनी ते पामरे । भोगिती अघोर यातना ॥ ६६. जे आम्हांस गुरु करा म्हणतात त्यांजजवळ गोविंद नाहीं असे समजावें. लावुनियां अंगा राख । म्हणती सुख आम्हांपाशीं ॥ भोळ्यां भाविकां भौदिती। भलते मंत्र तया देती॥ म्हणति आम्हां करा गुरु । उपचारु पूजेचा॥ एकाजनार्दनीं ते मैंद । नाहीं गोविंद तांपाशीं ॥ ६७. शिष्यापासून सेवा घेणे हे अधम लक्षण होय. शिष्यापासून सेवा घेणे । है तो लक्षण अधमाचें ॥ ऐसे असती गुरु बहु । नव्होच साहूं भार त्यांचा ॥ एकपणे समानता । गुरुशिष्य उरतां उपदेश । एकाजनार्दनी शरण । गुरु माझा जनार्दन ॥ ६८. मजला एकदा हरि दाखवा एवढीच कृपा तुम्ही संत मजवर करा. तुम्हीं संतजन । माझे ऐका हो वचन ॥ करा कृपा मजवरी । एकदां दाखवा तो हरि ॥ .१ हेतु, प्रेम. २ क्षुद्र. ३ फसवणे. ४ लुच्चा. सं...१३ HAL