________________
$ ९५] __ उपदेश. १०९ ९२. आमच्या कर्माकडे दोष असून, नारायणा, तुझ्याकडे शब्द नाही. पापाचे संचित देहासी दंडण । तुज नारायणा बोल नाहीं ॥ सुख अथवा दुःख भोगणे देहासी । सोस वासनेसी वाउंगाचि ॥ पेरी कडु जीरे इच्छी अमृतफळ । अर्कवृक्षा केळी केविं येती ॥ मुसळाचे धनु न होय सर्वथा । पाषाण पिळितां रस कैंचा ॥ नामदेव म्हणे देवा का रुसावे । मनाला पुसावे आपुलिया ॥ ९३. श्रीमुख हृदयांत बिंबेल तरच देहबुद्धि पालटेल. सांवळी श्रीमूर्ति हृदयीं बिंबली। तरी पालटली देहबुद्धि ॥ धन्य माझा जन्म धन्य माझा भाव । ध्यानी केशिराज नांदतसे ॥ आशा तृष्णा कैशा मावळल्या देहीं । बुडोनियां पायीं ठेले चित्त ॥ नामा म्हणे ऐसी विश्रांति पैं झाली। हृदयीं न्याहाळी केशिराज || ९४. दगडाचा देव व मायेचा भक्त या उभयतांचा संदेह कशाने फिटणार ? देव दगडाचा भक्त हा मावेचा। संदेह दोघांचा फिटे कैसा ॥ ऐसे देव देही फोडिले तुरकी। घातले उदकी बोभातीना ॥ ऐसी लोहंदैवते नको दावू देवा । नामा म्हणे केशवा विनवीतसे ॥ ९५, सजीव तुळस तोडून निर्जीव दगडाची पूजा का करतोस ? पोटीं अहंतेसी ठाव । जिव्हे सकळ शास्त्रांचा सराव ॥ भजन चालिले उफराटे । कोण जाणे खरे खोटें ॥ १ व्यर्थ. २ रुईचे झाड, ३ देहधारी, सगुण. ४ मुसलमान. ५ ओरडणे. ६ लोखंडादिक धातूंची.