________________
माया संतवचनामृत : नामदेव. [६८९ नळराव पुरुषार्थी । तयाच्या विपत्ति प्रारब्धं ॥ पतिव्रता सुशीळ । दमयंती पाये पोळे । ऐसे अनिवार कपाळ । भोगी दुष्काळ प्रारब्धे ॥ ऐसी अनिवार जन्मांतरे । राज्य सांडिले रघुवीरें । सर्वै मेळवूनि वानरें । फिरवी दिगांतरे प्रारब्धे ॥ फिरत असतां काय झालें । पुढे प्रारब्ध ओढवलें। जानकीस राक्षसे नेलें । कष्ट भोगविले प्रारब्धे ॥ कर्मा आधीन शरीर । पूर्ण ब्रह्म रामचंद्र। रघुपति विष्णूचा अवतार । पाठी जन्मांतर नामा म्हणे ॥ ९०, चोर शूळाकडे जात असतां पावलोपावली त्यास मृत्यु . सन्मुख येतो. चोरां ओढोनियां नेईजे 5 शूळीं। चालतां पाउली मृत्यु जैसा ॥ तैसी परी मज झाली नारायणा । दिवसे दिवस उणा होत असे ।। वृक्षाचिये मुळी घालितां कु-हाडी। वेचे तैसी घडी आयुष्याची॥ नामा म्हणे हेही लहरीचे जळ । आदत सकळ भानुतेजें ॥ ९१. पायांस स्वर्ग लागो, अगर अंगावर आग्नि पडो, आत्मस्थितीचा _ भंग होऊ देऊ नये. निद्रिस्ताचे सेजे सर्प कां उर्वशी । पाहों विषयासी तैसे आम्हीं ॥ ऐसी कृपा केली माझ्या केशिराजै। प्रतीतीचे भौजे एकसरां॥ शेण आणि सोने भासते समान । रत्न कां पाषाण एकरूप ॥ पायां लागो स्वर्ग वरिपडो आग। आत्मस्थिति भंग नोहे नोहे ॥ नामाम्हणे कोणी निंदा आणि वंदा । झालो ब्रह्मानंदाकार आम्हीं॥ १ घटका. २ अनुभव. ३ कौतुक, मोठेपणा. ४ प्राप्त होवो.