Jump to content

पान:संतवचनामृत.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० संतवचनामृत : नामदेव. [९९५ सजीवासी हाणी लाथा। निर्जीवपायीं ठेवीं माथा ॥ . सजीव तुळसी तोडा। पूजा निर्जीव दगडा॥ बेला करी तोडातोडी। शिवा लाखोली रोकडी ॥ तोंड धरून मेंढा मारा। म्हणती सोमयाग करा॥ सिंदूर माखूनियां धोडा । त्यासि भजती पोरे रांडा ॥ अग्निहोत्राचा सुकाळ । कुशपिंपळाचा काळ ॥ मृत्तिकेची पूजा नागा। जित्या नागा घेती डांगा। नामा म्हणे अवघे खोटे। एक हरिनाम गोमटें॥ ९६. मनाचा आरसा निर्मळ करून तूं त्यांत आपले रूप पहा. भुजंग विखारे पवनाचा आहार । परि योगेश्वर म्हणों नये ॥ पवनाच्या अभ्यासे काया पालटी । परि तो वैकुंठी सरता नव्हे ॥ शुद्ध करी मन समता धरोनि ध्यान । तरीच भवबंधन तुटेल रे॥ 'पवित्र गंगाजळ मीन सेवी निर्मळ । परि दुष्ट केवळ कर्म त्याचे॥ अवचितां हेतु सांपडला गळीं । न सुटे तयेवेळी तीर्थोदकें । 'घर सांडोनियां वन सेविताती । वनीं कां नसती रोस व्याघ्र ।। काम क्रोध लोभ न संडवे मनीं । असोनियां वनी कोण काज ॥ बहुरूप्याचा नटा माथां भार जटा। भस्म राख सोटा हाती दंड ॥ धोती पोति कर्मावेगळा आँसे । हुंबरत असे अंगबळे ॥ त्रिपुंड्र टिळे अंगीं चंदनाची उटी। घालोनियां कंठी तुळसीमाळा॥ व्यापक हा हरि न धरिती चित्तौं । लटकियाची गती गातु असे ॥ मीतूंपण जरी ही दोन्ही सांडी।राखिसी तरी शेंडी हेचि कर्म ॥ मानसीं तूं मुंडी देहभाव सांडी। वासनेसी दंडी आत्ममये॥ . १ काठी. २ विष. ३ मान्य. ४ मासा. ५ अस्वल, ६ योगांतील क्रिया. ७ आदेश. ८ आत्मरूप होऊन. .