पान:संतति नियमन शास्र आणि पद्धति.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
संततिनियमनासाठी ब्रह्मचर्य

४७

असला तर या कालांतच फक्त संभोगरत होण्याचा व बाकीच्या काळांत ब्रह्मचर्याचें परिपालन करण्याचा उपदेश स्त्री-पुरुषांस करणें खात्रीने इष्ट होईल; पण उलट, 'सुरक्षित काळा'ची ही कल्पना केवळ कल्पनाच ठरली तर? आधुनिक वैद्यक व शारीरिक ज्ञानाचा तिला आधार नसला तर ? मग लोकांना ब्रह्मचर्याचा उपदेश कर- ण्याचा अर्थ असा होईल की त्यांनीं सबंद आयुष्यांत संभोगसुखाचा उपभोग फार तर तीन वेळां घ्यावा. पण हा उपदेश व्यावहारिक आहे काय ? सामान्य स्त्री-पुरुषांस असल्या असिधाराव्रताचे आचरण करणें शक्य आहे काय ?
 हे सर्व प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यांचीं उत्तरें ज्या प्रकारचीं मिळतील त्या प्रकारें ब्रह्मचर्य हें संततिनियमनाचें व्यावहारिक साधन आहे किंवा नाहीं या गोष्टीचा आपल्याला निकाल लावतां येईल. म्हणून या प्रश्नांचा विचार पुढील प्रकरणांत स्वतंत्रपणें करणेंच योग्य होईल.