पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० ताळे पडत असतें. किड्यांचें संगोपन चांगल्या तऱ्हेनें केल्यास सहा मण पाल्यापासून तेरा शेर कोसले सहज तयार होऊं शकतात. रेशमाचा बाजारभाव नेहमीं चढता उतरता असतो. कधीं कधीं शेरी पंधरा रुपयां पावेतों देखील किंमत चढत असते. किंमत अगदीं उतरली असली, तरी त्याची किंमत शेरी बारा रुपयांप्रमाणे सातशे ब्याणव व फाटाची किंमत शेरीं चार रुपयांप्रमाणें सोळा रुपये मिळून एकंदर आठशे आठ रुपये मिळतात. याप्रमाणें एक एकरापासून दरसाल आठशें आठ रुपये उत्पन्न होतें. लागवडीची व्यवस्था जर चांगली केलेली असेल, तर एक एकराच्या लागवडींतून साहशें मण पाला मिळणें कांहीं कठिण नाहीं. व वरप्रमाणें हिशोब करून पाहतां एक एकरांतून दरसाल शंभर शेर मकतुली रेशीम व जवळ जवळ सहा शेर फाटाचें रेशीम तयार होऊन पडत्या भावानें मकतुली रेशमाची किंमत बाराशें रुपये मिळून फाटाची चोवीस रुपये किंमत मिळते. ह्मणजे एकंदर एक एकरांतून एक हजार दोनशें चौबीस रुपये उत्पन्न होऊं शकतात. धंदा सुरू करताना त्यास लागणाऱ्या साहित्याप्रीत्यर्थ जो खर्च करावा लागत असतो, तो खर्च ( डेडस्टॉक) या सदरांत घातला जातो. व हा झालेला खर्च शिल्लक असल्यासारखाच दाखविला जात असतो.