पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६९ करूं शकतो, व जवळ जवळ पांच तोळे फाटाचें रेशीम तयार करूं शकतो. गुंतागुतीचें रेशीम जें कोसले उकल- तांना निघत असतें, त्यास फाटाचे रेशीम असें ह्मणत अस- तात. पटवेकरी लोक याच फाटाचे रेशमाचा उपयोग करतांना आढळतात. बाजार जरी अगदीं पडता असला तरी मकतुली रेशमास शेरीं बारा रुपये प्रमाण किंमत येते. कित्येक प्रसंगी कोसले चांगले नसतात, व ते बारीक झुरमुळ्यांसारखे होतात. अशा समयीं एक शेर रेशीम तयार करण्यास पंधरा शेर देखील कोसले लागतात. अशा कोसल्यांचें फाटाचें रेशीम जास्त निघतें. कधीं कधीं या फाटाच्या रेशमाचें प्रमाण एक शेर मकतुली रेशमाबरोबर पंधरा तोळे फाटाचें रेशीम, इतकें देखील पडतें. शेरी बारा रुपयांपेक्षां याची किंमत कधीं कमी झालेली आढळत नाहीं. याप्रमाणे सहा मण पाल्याची किंमत कृतीनें बारा रुपये मिळवितां येते. चांगल्या तऱ्हेने केलेल्या लागवडीपासून, मग ती बंगाली असो किंवा झाडांची असो, एकरी पहिल्याच सालीं कमीत- कमी चारशें मण पाला मिळू शकतो. व वरील मानानें त्यावर आठों शेर कोसले तयार होऊं शकतात. व त्यापासून सहा- सष्ट शेर मकतुली रेशीम व जवळ जवळ चार शेर फाटाचें रेशीम तयार होते. कोसले जर चांगले असतील, तर दहा शेर कौसल्यांपासून देखील एक शेर रेशीम निघू शकते. पण अशा प्रसंगी फाटाच्या रेशमाचें प्रमाण शेरी दोन ते चार १५