पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६८ तार अधिक बळकट व सर्व सारखी साफ होते. रेशीम उकलण्यास जें पाणी घ्यावयाचें, तें पावसाचें घेतल्यास अति उत्तम. असल्या पाण्यांत तयार केलेलें रेशीम जोरदार असून त्यास बळकटीही बरीच असते. अवांतर पाणी जरी चांगलें, तरी पण त्यांतले त्यांत चुन्याचा अंश असलेलें पाणी कधीही उपयोगास घेऊं नये. असल्या पाण्यानें रेश- माची बळकटी व विद्युच्छक्ति कमी होते. प्राप्तीचा व खर्चाचा अंदाज. रेशमाचे किडे पाळून त्यांपासून रेशीम तयार करणास काय खर्च येतो, व त्यापासून काय फायदा करतां येतो, हैं नक्की सांगणे कठिण आहे. पण त्याचा अंदाज सांगणें मात्र शक्य असतें. फायदा कमी अधिक मिळणें हें हा धंदा करणाराच्या प्रवीणतेवर व कल्पकतेवर अवलंबून असतें. रोगप्रतिबंधक उपायां खेरीज अवांतर खर्चाच्या बाबतींत काटकसरीनें व टापटिपीनें काम करणारा सर्वांत अधिक फायदा मिळवू शकतो. सहा मण पाल्यावर किडे पाळले असतां मणीं दोन शेर प्रमाणे बारा शेर कोसले तयार होतात. एखादा प्रवीण माणूस इतक्याच पाल्यावर किडे पाळून जवळ जवळ तेरा शेर देखील कोसले तयार करूं शकतो. रेशीम उकलणारा जर चांगला असेल, तर अकरा शेर कच्या कोसल्यांचें एक शेर मकतुली रेशीम, म्हणजे अव्वल प्रतीचें रेशीम, तयार