पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६७ कच्या अकरा शेर कोसल्यांपासून, ह्मणजे वाळलेल्या अजमासें पांच शेर कोसल्यांपासून, एक शेर सलंग तारे चें रेशीम व जवळ जवळ पाऊण शेर गुंतावळ्याचें ह्मणजे वेस्ट रेशीम निघते. पहिल्यानें कोसले ज्या वेळीं कच्चे अस- तात, ह्मणजे ताजे असतात, त्या वेळीं ते नुकतेच तयार झालेले ' असल्यानें त्यांतील घुले ओले असतात; तसेंच त्यांतील रेशमाचेंही आवरण ओलसर असतें. ते जसजसे वाळत जातात, तसतसें त्यांचें वजन कमी होत जातें, व अखेरीस चांगले वाळल्यावर कोसले आपल्या वजनाच्या तिपटीनें कमी वजनाचे होतात. रेशमाची तार एकजीव व साफ व्हावी, ह्मणून पहिल्यानें तारडोळ्यांतून ओवून घेऊन आपल्याच अंगच्या दुसन्या भागास घासली जाऊन रहाटावर गुंडाळली जाण्याची सोय केलेली असते. ह्यानें तार एकजीव व साफ होण्याची क्रिया जरी साधारण बरी होते, तरी पण ती तार घुल्यांच्या लेहा- च्याच रसाने भिजली जावी, अशी सोय केल्यास त्यां - त्यांत अधिक चांगला परिणाम होतो. कोसल्यांतील वाळ- लेले घुले घेऊन त्यांचें अगदी बारीक चूर्ण करावें; इतकें कीं, तें पाण्यांत टाकल्याबरोबर त्याचें पाण्याशी अगदीं तादात्म्य व्हावें. व असें तादात्म्य झालेलें पाणी कोसले उक- ळण्याच्या काम घ्यावें. हें असें घुल्यांच्या चूर्णाशी एकजीव झालेले पाणी चिकट असतें. व अशा चिकण्या पाण्यांतून निघणारे तंतु एकमेकांशीं अगदीं एकरूप होतात. व त्यानें