पान:तुतीपासून रेशीम.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६६ रेशीम निघण्यास पुरेसे होतात. याप्रमाणें आठ तासांच्या मेहन- तीनें दहा ते बारा तोळ्यांच्या चार लडी ते तयार करतात. पहिल्या चार तासांत दोन व पुढील चार तासांत दोन, मिळून एका दिवसांत दोन मनुष्यें वीस ते पस्तीस तोळ्यांच्या वजनाच्या चार लड्या तयार करूं शकतात. आपण असें घेऊन चालूं कीं, रोज आठ वाजतां रेशीम उकलणारे कामावर लावले, ह्मणजे ते एकसारखे बारा वाजे- पर्यंत काम करून नंतर एक तासाची सुट्टी घेतात. त्या वेळे पावेतों त्यांनी रहाटावर जितकें रेशीम उकललें असेल, तितकें ते काढून घेतात, व त्यांत थोडासा ओलसरपणा राहिलेला असल्यास तो नाहींसा व्हावा ह्मणून खिळ्याला अडकवून ठेवतात व नंतर ते बाहेर जातात. रेशीम रहाटावरून काढून घ्यावयाचे आधीं त्यांत कांहीं फुलक्या आहेत की काय, हें पाहून फुलक्या असल्यास तार- न तुटेल अशा बेतानें त्या चिमटीने काढून टाकतात. व त्या तारेच्याच शेवटाच्या धाग्याने बाजारांत मिळणाऱ्या दोऱ्यांच्या लड्यांप्रमाणें गांठ मारतात. अशी गांठ मारल्यानें त्या लड्यांतून फिरून रेशीम उलगडतांना झणजे लड्या फोड- तांना शेवट शोधावा लागत नाहीं, व सर्व तारांच्या वर्तु- ळांचा मध्य एकदम सांपडतो. याप्रमाणें गांठ मारल्यावर त्या रेशमाच्या लड्या रहाटावरून काढून घ्याव्यात व त्यांस पीळ घालून विक्रीकरतां ठेवावें.