पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६२ छिद्रांच्या तोंडाशी केरकचरा जमून अथवा कोस- ल्यांच्या आवरणांचा भाग एकदम सुटला जाऊन, त्याचा गुंता छिद्रांशी जमल्यानें वगैरे अनेक कारणांनी तारडोळ्यांच्या छिद्रांमधून तार जात असतां तुटते. अशा समयीं रहाट फिर- विण्याचा थांबवून तुटलेल्या ठिकाणीं ठरीव संख्येची तार पुन्हां ओवून घेऊन त्यास गांठ मारावी, व पुन्हां रहाट फिरवू लागावें. कित्येक मंडळी तुटलेल्या ठिकाणीं गांठ न मारतां नवी तार रहाटास तशीच गुंडाळून रहाट फिरवूं लागतात. पण ही त्यांची चूक आहे. त्यांच्या असें करण्यानें त्यांचें रेशीम हलकें गणलें जातें. ह्मणून प्रत्येक तुटलेल्या ठिकाणीं तारेस तार जोडण्यास विसरूं नये. रेशीम उकलीत अस- तांना असला कचरा किंवा गुंता छिद्रांशीं जमतो ना जमतो, तोंच तो काढून टाकीत जावा. छिद्रांशीं कचरा जमत आहे, असें नजरेस आल्यास ताबडतोब उजव्या हाताचे चिमटीनें धरून हलक्या हातानें ओढलें असतां तो सहज काढतां येतो. कित्येक वेळां नुसते बोटानें छिद्रांपाशीं तारेस हल- विल्यानें देखील असला कचरा निघून जातो. उकलण्याकरतां कढईंत घेतलेल्या सर्व कोसल्यांचे रेशीम काढणें झालें, ह्मणजे ज्या ठरीव कोसल्यांच्या तारांच्या जाडीची तार काढणें चाललें असेल, त्यांत कमी पडल्यास भर देण्यास उलगडल्या जाणाऱ्या कोसल्यांचे तंतु आपणा- पाशीं असलेले संपून गेले असतील, तर रहाट थांबवून त्या उलगडल्या जाणाऱ्या कोसल्यांस कढईतून काढून