पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६१ एखादा उलगडला जाणारा कोसला संपल्यामुळे, ह्मणजे उलगडल्या जाणाऱ्या कोसल्यांतील एखाद्या कोसल्याची तार संपल्यामुळे, दुसऱ्या कोसल्याच्या तारेची भर देतांना दोन तारा त्या उलगडल्या जाणाऱ्या तारांवर मारून नंतर त्यांतून अधिक झालेली तार तोडून घ्यावी, असें आह्मी ह्यटलें आहे. याचे कारण असें आहे कीं, दोन तारा त्या उलग- डल्या जाणाऱ्या तारांवर एके वेळीं मारल्यानें त्या त्यांत सहज गुरफटून जाऊन त्या उलगडल्या जाणाऱ्या तारांस जुडल्या जातात. कोसल्यांचा तंतु अति सूक्ष्म असतो. असा एकच तंतु तारांवर फेकल्यास तो जोरानें गुरफटला जात नाहीं. ह्मणून दोन तारा गुरफटण्याकरतां टाकून नंतर एक तोडून घ्यावी. एकसारख्या समान जाडीची तार काढल्यानें त्याची किंमत अधिक वाढते. ह्मणजे ज्या मानानें रेशमाची तार एकसारख्या जाडीची असेल, त्या मानानें त्यास चांगला भाव येतो. रेशीम उकलतांना जे कित्येक कोसले उलगडले जातात, त्यांची एकसारखी संख्या राखण्याकडे कोणी कोणी लक्ष देत नाहींत. अशानें रेशमाची तार कोठें सहा तंतूंच्या जाडीची तर कोठें दहाच्या जाडीची, कोठें नवाच्या जाडीची तर कोठें पांचाच्या जाडीची, अशी निघते. व असल्या रेशमास फारच हलका भाव येतो. ह्मणून उलगडल्या जाणाऱ्या कोसल्यांची संख्या सदोदित एकसारखी ठेवण्याची खबरदारी घ्यावी.