पान:तुतीपासून रेशीम.pdf/१६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१६३ तारठोकळ्यांवर ठेवावें, व कढईतील पाणी आधणाचे उष्ण- तेचें करून त्यांत फिरून दोन अडीचशें कोसले टाकून पूर्ववत् क्रियेनें त्यांचे तंतु काढून ते हातांत धरावेत, व ठोकळ्यावर ठेवलेले कोसले कढईत टाकून रेशीम काढण्यास सुरू करावें. अखेरीस ठरीव संख्येचे तंतु उलगडले जात असतां ते उलगडले जात असलेले कोसले काढून तार- ठोकळ्यावर ठेवावे, असें जें आह्मी ह्यटलें आहे, याचें कारण असें कीं, फिरून कोसल्याचे तंतु काढून घेतल्यावर त्याचें रेशीम काढावयाचे कामास, कढईपासून रहाटापर्यंत पहिली तार काम चालण्याच्या स्थितींत असल्यानें, एकदम सुरुवात करतां येते. कित्येक लोक असे अखेरचे तंतु शिल्लक राहिले, ह्मणजे तार तोडून काढीत असतात, व फिरून कोसल्यांचे तंतु भरीस घालण्याकरितां काढल्यावर त्यांतील ठरीव संख्येची तार तारडोळ्यांतून ओवून घेऊन रहाटावरील तंतूस तोडल्या ठिकाणीं जोडून त्यांचें रेशीम काढावयास सुरुवात करतात. असें करणें ह्मणजे वाईट, असें आमचें झणणे नाहीं. पण अशा समयीं शेवटचे कोसले उचलून तारठोकळ्यावर ठेवल्याने पुन्हां तारा तारडोळ्यांतून ओवून घेऊन रहाटावरील तारांस जोडण्याचें कारण नसतें. पहिल्या कोसल्यांच्या तारा उलगडण्याचें झाल्यावर फिरून कोसले उलगडण्याकरितां कढईत घ्यावयाचे आधीं उलगडल्या गेलेल्या कोसल्यांतील घुले तसेंच अवांतर केरकचरा कढईतील पाण्यांत असतो, तो काढून टाकावा.