पान:छन्दोरचना.djvu/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इन च्या सौजन्याने ४३ काही छन्दोविषयक प्रश्न सावरिशी मृदुल करें विगलित कचनिचय विपुल आणि करिशि नयनांची झुघडझांक कमलशी ऽ” (वागीश्वरी ४। ३) या पद्य-परिच्छेदांत गुण हा आहे की कोणत्याहि चरणांत आद्यतालकपूर्व गण नाही. प्रत्येक चरणांतील पहिली टाळी पहिल्याच अक्षरावर पडते. यामुळे वाचकाचा गोन्धळ होत नाही. चरणांत कितीहेि आवर्तनें असोत; विराम अस लाच तर तेो अन्तीं येतो. पण झुलटपक्षीं, भावार्थास अनुसरून विराम चरणा मध्येच वाटेल तेथे, वाटेल तितक्या काळाचा आणि वाटेल तितके वेळा घेण्याची सोय या पद्यपरिच्छेदांत दिसत नाही अष्टमात्रक, सप्तमात्रक आणि षण्मात्रक आवर्तनांच्या रचनेचीं झुदाहरणे झालीं. पञ्चमात्रक आवर्तनाचेंहि स्वैरपद्य रचितां ये अील. हीं सारी झुदाहरणे जातिरचनेचीं आहेत मुक्तच्छन्द छन्दांतहि मुक्तच्छन्द लिहिण्याचे प्रयोग चालू आहेत. रा. वामन नारायण देशपाण्डे हे छन्दांचा सक्रिय पुरस्कार करितात. ' नन्दनवन मुकल्यावर ' या त्यांच्या काव्यांतील पुढील अवतरण अष्टमात्रक आवर्तनाचें म्हणजे छन्दांत चार अक्षरांचे आहे. “तम केव्हा सरे ?” “हाय! केव्हा तें सरेल ? धडधडे अभूर, वाटे आताच फुटेल. झाक मुख केशीं, मीहि झाकी ओका हातें, तमोभय हो कमती मिटतां नेत्रांतें राहूं दे हा दुजा कर कटीस गुम्फून-'

  • अन्त नच देवा, का रे तिमिरालागून ?

(प्रतिभा, विशेषाङ्क १९३५)