पान:छन्दोरचना.djvu/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पीडीएफ सुरेशभट इनच्या सौजन्याने याला ते छन्द अक्षरलेखा शाकरी म्हणतात . चौदा अक्षरांच्या वृत्तांचा जो वर्ग त्याला शाकरी म्हणण्यांत येतें. वरील पद्याच्या प्रत्येक चरणांत चौदा अक्षरें आहेत हें मान्य; पण शबकरी हें नाव ज्यांतील चरण चौदा अक्षरी आहेत अशा कोणत्याहेि रचनेला लागतें. हा छन्द मुक्त नाही. वरील पद्यांत तीन अष्टमात्रक आवर्तने असून चौथ्या आवर्तनांत चार सशब्द मात्रा आहेत. अशा रचनेला ती जातिस्वरूप असल्यास आपण जाति साकी म्हणतो त्याप्रमाणे ती छन्दःस्वरूप असल्यास तीस छन्द साकी वा छान्दस साकी म्हणावें हें युक्त होय. चौदाच अक्षरांच्या पण ( ३॥३॥३॥३॥२) अशा मोडणीच्या रचनेला निराळे नाव द्यावें लागेल; पाण तें असो या अवतरणांतील सारेच चरण सारख्या लाम्बीचे आणि घटनेचे आहेत संवादांत प्रत्येकाचें भाषण चरणान्तीं म्हणजे चौदाव्या अक्षरावर सम्पावें असा नियम कृत्रिम हो औील, म्हणून वाक्ये जेथे चरणान्तीं सम्पत नाहीत तेथे ती सहाव्या वा बहुशः आठव्या अक्षरान्तीं सम्पविली आहेत. म्हणजे काय, वाक्य चरणांत वाटेल त्या ठिकाणीं समपत नाहीच. मग दीर्घ रचना करितांना जाती पेक्षा छन्दाचा अवलम्ब करण्यांत विशेष काय साधण्यांत आलेलें ? चरणांत काही ठेिकाणीं वाक्य सम्पवितां येण्याची सोय साकीजातींत आणि साकीसारख्या अितर जातींतहि आहे. अभागी कमल, आम्बरा औी अित्यादि दीर्घ काव्यांची रचना पहातां वाक्य मध्येच कोठे आणि कसें सम्पवू ही अडचण गिरीशकवींना भासलेली नाही. जातिरचना ही छन्दोरचनेहून कठिण आहे अशीहि स्थिति नाही. आणि पुन्हा, छन्दांत अॅक वैगुण्य आहे तें जातींत नाही. व्यवहाराच्या भाषेत सुद्धा लघु-गुरुभेद आहे. हा लगत्व-भेद भाषेच्या हार्डींमासींच नव्हे तर अगदीं स्वभावांत भिनला आहे. तेव्हा तो भेद ज्या पद्धतींत नाही त्या पद्धतीने काव्य लिहिण्याची परम्परा प्राचीन असली तरी मोठ्या प्रमाणावर तिचा अवलम्ब केल्यास ती कृति नेहमीच्या पद्धतीहून अगदीच भिन्न म्हणजे तेवढ्या पुरती तरी चमत्कारिक आणि कृत्रिम वाटल्याविना रहाणार नाही रा० आत्माराम रावजी देशपाण्डे यांनी आपल्या * प्रेम आणि जीवन' या काव्यांत ज्या मुक्तच्छन्दाचा प्रयोग केला आहे त्याची चिकित्सा करून पाहूः